भव्यावहारिक मराठी by डॉ. कल्याण काळे, डॉ. दत्तात्रय पुंडे
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एक प्रागतिक विद्यापीठ आहे. 1983-84 या शैक्षणिक वर्षी प्रथम वर्ष बाणिज्य (सत्र - 2) आणि द्वितीय वर्ष विज्ञान (सत्र - 4) यासाठी 'व्याबहारिक मराठी'चा अभ्यासक्रम सुरू केला. पुणे विद्यापीठाची स्थापनाच मुळात मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी झालेली असल्याने विशेषकरून बाणिज्य आणि विज्ञान शाखांकरिता या विद्यापीठाने “व्यावहारिक मराठी' या नवीन विषयाचा अभ्यासक्रम सुरू करणे ही खरोखरच एक क्रांतिकारक घटना होय. 'व्याबहारिक मराठी' या विषयाचा एका संपूर्ण सत्रासाठीचा अभ्यासक्रम सुरू करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ होय ही गोष्ट मुद्दाम नमूद करण्यासारखी आहे.
विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने या दोन वर्गांसाठी मान्य केलेला अभ्यासक्रम डोळ्यांसमोर ठेवून आम्ही हे पुस्तक तयार केलेले आहे. वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखांसाठी मराठी अभ्यास मंडळाने मान्य केलेले अभ्यासक्रम जबळजवळ सारखेच असल्याने या दोन्हींचा एकत्र समावेश करून आम्ही एकच पुस्तक तयार केले आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Sc, B.Com Students