वसन 2013 नंतर परत आपल्या भेटीला आलोय. आमच्या पहिल्या अनुक्रमे 2004, 2008 व 2013 च्या पुस्तकांना त त्यांच्या अनेक आवृत्तींना आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आम्ही आपले तरणी आहोत.
अनेक दशकांनंतर पुन्हा एकदा सेमिस्टर पॅटर्नची सुरुवात होतेय व त्याची सांगड यावेळी क्रेडिटसोबत जोडली आहे. विद्यार्थ्याबरोबरच शिक्षकांमध्येही काही प्रमाणात नवीन पॅटनेबद्दल औत्सुक्य व संभ्रमही आहेत. यथावकाश ते सर्व ढूर होतीलच.
समाजशास्त्र अभ्यास मंडळाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी या अभ्यासक्रमाची निवड करताना खूप कष्ट व काळजी घेतलेली दिसते. मागील अभ्यासक्रमातील कालबाह्य बाबी काढून टाकून समकालीन सामाजिक बदलांचा विचार करूनच या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
सेट/नेटसारख्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा व इतर समाजशास्त्र विषय निवडून ज्या काही व्यावसायिक संधी विद्यार्थ्यांना आहेत त्यासाठी त्यांचा प्रवास सुकर व्हावा हाही या अभ्यासक्रमामागील उद्देश आहे.
समाजशास्त्रातील वाढत्या संधी, संशोधन, आर्थिक, शिक्षण, कायदा, पत्रकारिता, औद्योगिक, राजकीय, सामाजिक यांतील समकालीन मुद्धवांना या अभ्यासक्रमात समाविष्ठ केले आहे.
This book Useful for B.A. Students.
1. Emergence Of Sociology As A Discipline
2. Basic Concepts In Sociology
3. Culture, Inequality And Social Exclusion