सामाजिक शास्त्र : अध्ययन - अध्यापनशास्त्र (भाग 1 : इतिहास व नागरिकशास्त्र , भाग 2 : भूगोल ) by डॉ. सुभाष राठोड, डॉ. सतीश उ. पाटील
Book Summary:
“प्राथमिक शिक्षण पदविके'च्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम तुम्ही यशस्वीपणे पार पाडलात याबद्दल प्रथमत: तुमचे मनापासून अभिनंदन ! द्वितीय वर्षाचे सामाजिक शास्त्र : अध्ययन-अध्यापनशास्त्र भाग - 1 व 2 हे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हास अत्यानंद होत आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005, राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010, राष्ट्रीय शिक्षक शिक्षणाचा अभ्यासक्रम आराखडा - 2009 (NCFTE- 2009) तसेच मा. न्यायमूर्ती वर्मा समितीने शिक्षक शिक्षणाबाबत केलेल्या भरीव मार्गदर्शक सूचना यांच्या अनुषंगाने म.रा. शै. सं.व प्र. परिषद, (विद्या प्राधिकरण) पुणे या महाराष्ट्र शासनाच्या शिखर संस्थेने 'प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.) अभ्यासक्रम 2016" तयार केला. या सुधारित नवीन अभ्यासक्रमानुसार हे पाठ्यपुस्तक लिहिलेले आहे.
21 वे शतक हे तंत्रयुग व ज्ञानयुग म्णून ओळखले जात आहे. विद्यार्थ्यांची उदयाला येणारी नवीन पिढी टी माहिती तंत्रज्ञान युगात शिकणारी आष्ठे. ती अतिशय चिकित्सक व सर्जनशील आहे. त्यांना पोषक असे शिक्षण पुरविणे टी काळाची गरज आहे. सध्याच्या काळात विज्ञान, तंत्रज्ञानाबरोबरच शिक्षणातील बदलत्या संकल्पना, अध्यापन पद्धती व मूल्यमापन पद्धती यांमध्ये कालसुसंगत बदल होत आहेत. या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आपणास नक्कीच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Exam.