राज्यशास्त्र (प्रशासकीय सिध्दांत) by Prin. Dr. Eknath Khandave, Mr. Shivaji Gaikwad, Mr. Chandrasing Rajput
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. राज्यशास्त्र (प्रशासकीय सिद्धांत - PO-C2) या पेपरच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या सुधारणांची जून २00१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात प्रशासकीय सिद्धांताबाबत महत्त्वपूर्ण विवचेन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
प्रस्तुत पुस्तकाच्या सुरूवातीला लोकप्रशासन या संकल्पनेचा आढावा घेण्यात आला आहे. लोकप्रशासनाचा विकास, बदलते स्वरूप आणि बदलती भूमिका जाणून घेण्यात आली आहे. लोकप्रशासनाच्या अभ्यासाचे प्रमुख दृष्टिकोन आणि सिद्धांत यांचे विस्ताराने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संघटना हा प्रशासनातील महत्त्वाचा घटक मानला जतो. त्यामुळे संघटनेच्या विविध तत्त्वांचा आढावा घेण्यात आला आहे. जागतिकीकरणाच्या काळात लोकप्रशासनात महत्त्वपूर्ण बदल घडून आले आहे. नवलोकव्यवस्थापन, उदारीकरण आणि खासगीकरण या संकल्पनांची माहिती जाणून घेण्यात आली आहे. प्रशासकीय भ्रष्ट्राचार लोकपाल व लोकायुक्त याबाबत विस्ताराने चर्चा करण्यात आली आहे. एकूणच प्रशासकीय सिद्धांताचे अवलोकन करणारे हे एक उपयुक्त पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Political Science Students.
Table of Content:
1. Public Administration
2. Major Approaches to Public Administration
3. Theories of Public Administration
4. Principles of Organisation
5. New Trends in Public Administration
6. Governance