राज्यशास्त्र (भारतातील राजकीय संस्था) by Dr. Rajkumar Rikame, Dr. Vittal Kapadi
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. राज्यशास्त्र (भारतातील राजकीय संस्था - PO-C3) या पेपरच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या सुधारणांची जून २00१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतातील राजकीय संस्थांबाबत महत्त्वपूर्ण विवचेन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
पुस्तकाच्या सुरूवातीला भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा ऐतिहासिक आढावा घेण्यात आला आहे. भारताच्या “भारतातील राजकीय संस्था' या पुस्तकात प्रथम राजकीय संस्थांच्या जडण-घडणीत साहाय्यभूत ठरलेल्या एकात्मता, अखंडत्व, लोकशाही व सक्रीय राज्य या तत्त्वांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. भारतीय संघराज्य व्यवस्थेतील प्रमुख मुद्यांची तपशीलवार चर्चा या स्तकाद्वारे करण्यात आली आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ या भारतातील प्रमुख शासकीय यंत्रणा मानल्या जातात. या सर्व शासकीय संस्थांची सविस्तरपणे माहिती या पुस्तकात नमूद करण्यात आली आहे. आधार कार्ड, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आणि सशस्त्र सीमा विशेषाधिकार कायदा या सुरक्षितता व जनकल्याणविषयक यंत्रणांचा अभ्यास देखील प्रस्तुत पुस्तक पुरविते. एकूणच भारतातील राजकीय संस्थांची ओळख करून देणारे हे एक वेगळ्या शैलीचे पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Political Science Students.
Table of Content:
1. Nationalist legacies
2. Federal institutions
3. Executive
4. Legislature
5. Judiciary
6. Welfare, Regulation and Security