राज्यशास्त्र (भारताचे परराष्ट्रीय धोरण) by Dr. Sunil Kawade, Mr. Eknath Nirmal
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. राज्यशास्त्र (भारताचे परराष्ट्रीय धोरण - PO-O3) या पेपरच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या सुधारणांची जून २00१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतातील परराष्ट्रीय धोरणाबाबत महत्त्वपूर्ण विवचेन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
पुस्तकाच्या सुरूवातीला भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा ऐतिहासिक आढावा घेण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे निर्धारक घटक स्पष्ट करण्यात आले आहे. स्वातंत्र्यप्रापती पासून आजतागायत भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा विकास वेगवेगळ्या टप्प्यांद्वारे घडून आला आहे. त्यामुळे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाच्या विकासातील हे महत्त्वपूर्ण टप्पे अभ्यासण्यात आले आहे. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाच्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. भारताचे पाकिस्तान व इतर शेजारील राष्ट्रांसोबत असणारे संबंध अभ्यासण्यात आले आहे. अमेरिका, रशिया व चीन या महासत्तांबाबतचे भारताचे परराष्ट्रीय धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. भारताचे सार्क, युरोपियन युनियन आणि ब्रिक्स या प्रादेशिक संघटनांबाबतचे धोरण अभ्यासण्यात आले आहे. एकूणच भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे विश्लेषण करणारे हे एक उपयुक्त पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Political Science Students.
Table of Content:
1. Nature and Determinants of India's Foreign Policy
2. Evolution of Indian Foreign Policy
3. Making of Foreign Policy: Actors and Processes
4. India and Her Neighbors: Contemporary Issues
5. India and Major Powers
6. India and Regional Organizations