प्रारंभिक भारत : प्रागैतिहासीक काळ ते मौर्यकाळ by प्रा. ज्योती गणेश राऊत
Book Summary:
प्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-1 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून *प्रारॉभिक भारत : प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ' हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्रागैतिहासिक काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रारंभिक भारत : साधने आणि प्रागैतिहासिक काळ, हडप्पा संस्कृती : कांस्ययुगीन सभ्यता, वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह : जैन आणि बौद्ध धर्म, महाजन पदांचा उदय आणि मौर्यकाळ या चार पाठांद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे.
हा अभ्यासक्रम नेमण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट्य म्हणजे प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूणच भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करण्यासाठी मूलाधार आहे. हा पेपर विद्यार्थ्यांना प्रागेतिहासिक काळ ते मौर्य काळापर्यंतच्या इतिहासाचे आकलन होण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांना राजकीय व्यवस्था, कला, साहित्य, तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विविध महत्त्वाच्या बाबींसाठी प्रारंभिक काळातील भारतीयांनी दिलेल्या योगदानाचा परिचय करून देण्याचा उद्देश आहे. प्रारंभिक भारतीय इतिहासाच्या अभ्यासाद्वारे विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Early India : Sources and Prehistory
2. Harappan Culture : Bronze Age Civilization
3. Vedic Culture, Religious Protest : Jainism and Buddhism
4. Emergence of the Mahajanpadas and the Age of the Mauryas