प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र विकास व अध्यनन by प्रा. डॉ. संजीव सोनवणे, प्रा. डॉ. शोभा कागदे, प्रा. सौ. गौरी खेटे
Book Summary:
आपल्या आजूबाजूला असणारी हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, नाले-ओढे, नद्या, पक्षी, प्राणी अशा अनेक गोष्टी मनाला मोह घालत असतात. कितीतरी गोष्टी आपल्या आसपास घडत असतात. आपण मात्र शाळेच्या क्रमिक अभ्यासक्रमाची झापडं डोळ्यांवर चढवून चाकीरीबद्ध जीवन जगत असतो. त्यातून आपले अलुंभवविश्व खुजे राहते. शिक्षक म्हणून यावा आपण विचार करायला पाहिजे असे आम्हाला वाटते, मग ते शिक्षक प्राथमिक असो, महाविद्यालयीन असो वा अन्य कोणत्याही शाखेचे असीत.
दोन्ही पाय धडधाकट असताना आपण आपल्या विद्यार्थ्यांना कुबड्या घेऊन चालायला शिकवायचे का ९ निव्वळ परीक्षेतील गुणांच्या मागे लागूल स्वतःचा सर्वांगीण विकास नाकारणाऱ्या आंधळ्या शर्यतीतील स्पर्धक म्हणून विद्यार्थी तयार करायचे का ९ याचा विचार करण्याची वेळ आता शिक्षकांवर आली आहे. “मला काय त्याचे असे म्हणणे किंवा “निव्वळ बघ्याची भूमिका घेणे' ही विवारप्रवृत्ती शिक्षकांनी बदलली पाहिजे.
त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे, जबाबदारी घेण्यासाठी मुलांना तयार करायला हवे, त्यांच्या धडपडण्याच्या वृत्तीला दाद द्यायला हवी, चांगल्या गोष्टींसाठीचा त्यांचा हट्ट पुरवायला हवा. क्वचितप्रसंगी बंडरोरी मान्य करायला हवी. अशा प्रकारे लहानपणापासून छोट्या-छोट्या गोष्टीवूल मुलांची मनोवृत्ती तयार होत असते. अन् पुढे मोठ-मोठी कामे करताना व॑ गुणवत्तेचा आग्रह धरताना या छोट्या गोष्टींचा उपयोग होतो.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.