मराठी भाषा संप्रेषण व प्रभुत्व भाग 2 by डॉ. शीला कोलटकर, डॉ. अनिता पटवर्धन
Book Summary:
प्राथमिक शिक्षण पदविका (D.EI.Ed.) अभ्यासक्रमाची पुनर्रचना 2016 मध्ये झाली. त्याच्या्ठी आधी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण प्राथमिक अभ्यासक्रम 2012 मध्ये कार्यान्वित झाला. हे दोन्ही अभ्यासक्रम बदलले याचे एक मह्त्वाचे कारण ःझणजे बालकांच्या सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-अधिनियम 2009. या सर्व महत्त्वाच्या बदलांमुळे सक्षम शिक्षकांची आवश्यकता अधोरेखित केली गेली. या सर्व गोष्टींचा सम्यक् विचार करून प्रस्तुत पुस्तकाचे लेखन व मांडणी केली आहे. द्वितीय भाषा मराठी या विषयासाठी मराठी भाषा संग्रेबण व प्रभुत्व भाग-2 या पुस्तकाद्वारे आपल्याशी पुनर्भेट साधताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे.
मराठी भाषा संप्रेषण व प्रश्रुत्व भाग-1 या पुस्तकामध्ये श्रवण, भाषण व संभाषण या भाषिक कौशल्यांचा विचार केला आहवे. आपण या पुस्तकाचे स्वागत केले आहे. आता भाग-2 मध्ये वाचन व लेखन या दोन भाषिक कौशल्यांचा सविस्तर विचार केला आहे. मराठी द्वितीय भाषा झणून छात्राध्यापकांना अध्ययन-अध्यापन उत्तमरीत्या करता येण्यासाठी या पुस्तकाच्या लेखनात विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मराठी द्वितीय भाषा रणून छात्राध्यायक मराठी भाषेचे अध्ययन करणार आहेत. त्यांची मातृभाषा आणि मराठी भाषा यातील संरचनेतील साम्य-भ्रेदांचा अभ्यास करताना कधी पूरक ठरतील तर कधी अड्थळे निर्माण करतील. अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून प्रारंभकांचे वाचन ते साहित्यप्रकारांच्या वाचनापर्यंतचे अनुभव प्रस्तुत पुस्तकात दिलेले आहेत. लेखन या भाषिक कौशल्याचा विचार करताना लिपी ते सर्जनशील लेखनापर्यंतचा प्रवास टप्प्याटप्प्याने मांडला आहे. या भागातील लेखनात मूलभूत नियम व विचार यांच्या मांडणीसोबत विविध उदाहरणे दिली आहेत. त्यांचे व्यव्ठारात उपयोजन करता येईल.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Exam.