कलाशिक्षण : अध्ययन - अध्यापनशास्त्र (भाग 1 : चित्रकला, भाग 2 : संगीत) by डॉ. सतीश उत्तमराव पाटील, प्रा. महेशकुमार जाधव
Book Summary:
कलाशिक्षणाच्या ज्ञानामुळे सर्जनशीलतेला वाव मिळतो. विद्यार्थ्यांच्या सह्ठजप्रवृत्तीला अधिकाधिक चालना मिळावी, सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित होऊन नवनिर्मितीचे ज्ञान आत्मसात करता येईल असा आनंददायी ठरणारा, कलात्मक सौंदर्यदुष्टीचे ज्ञान देणारा कलाशिक्षण ्ठा विषय महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीला चालना देणे गरजेचे आहे. कारण रेखाटनाच्या कौशल्यातून त्याला कलाकृती साकारावयाची असते, या दृष्टीने छात्राध्यापकांनी प्रशिक्षण कालावधीत कलाशिक्षण या विषयाकडे तेवढ्याच गांग्रीर्याने व अभ्यासपूर्ण रीतीने लक्ष देण्यासाठी आणि पुढे त्या दुष्टीने तयारी करून घेण्यासाठी कलाशिक्षणाची आवश्यकता आष्े. अध्यापनात नवनवीन कल्पना वापरताना कलाशिक्षणाचा शैक्षणिक साहित्य करण्यासाठीही उपयोग होऊ शकतो.
कलाशिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक साधने तयार करणे, रंग, आकार यांचे ज्ञान मिळणे, निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, सौंदर्यशक्ती आदी क्षमतांच्या जास्तीत जास्त विकासासाठी प्रयत्न केला जातो. या विषयाची आवड निर्माण करणे. त्यातून कलाकृती निर्माण करणे, त्याचा उपयोग करून घेणे, त्यातील रंगांबरोबर आकार, आकलन वाढविणे या दृष्टीचा विकासही होत राष्ठतो. त्यासाठी छात्राध्यापकांनी कलाशिक्षण विषयाचे ज्ञान आत्मसात करणे निश्चितच महत्त्वाचे आहे. .
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Exam.