इतिहास, प्रारंभिक महाराष्ट्राचा इतिहास by Dr. Ashok Kamble, Mr. Dilip Bagul, Mr. Mahesh Ranawade
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. इतिहास (प्रारंभिक महाराष्ट्राचा इतिहास (सातवाहन ते राष्ट्रकूट कालखंड - HS-02) या पेपरच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या सुधारणांची जून २00१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात प्रारंभिक महाराष्ट्राच्या इतिहास कालखंडतील महत्त्वपूर्ण पैलूंवर सविस्तरपणे प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
पुस्तकाच्या सुरूवातीला प्रारंमिक महाराष्ट्राच्या इतिहास लेखन साधनांचा आढावा घेण्यात आला आहे. प्रारंमिक महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती पुरविणारी पुरातत्त्वीय साधने, वाडूमयीन साधने, नाणकशास्त्रीय साधने, पुराभिलेखीय साधने व परकीय साधने अभ्यासण्यात आली आहे. प्रारंमिक महाराष्ट्राच्या इतिहासातील सातवाहन, चालुक्य व राष्ट्रकूट या राजवंशाची विस्ताराने माहिती देण्यात आली आहे. या राजवंशाच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक जीवनाचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच तत्कालीन कला, साहित्य व स्थापत्त्य याबाबत विवेचन करण्यात आले आहे. एकूणच प्रांरमिक महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती पुरविणारे हे एक उपयुक्त पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. History Students.
Table of Content:
1. Sources
2. Satavahana Dynasty
3. The Chalukyas
4. The Rashtrakutas