इतिहास, प्रारंभिक भारतातील संकल्पना आणि संस्थाचा विकास by Dr. Bharati Navthar, Dr. Swati Kalbhor
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. इतिहास (प्रारंमिक भारतातील संकल्पना आणि संस्थांचा विकास - HS-C2) या पेपरच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या सुधारणांची जून २0१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतातील संकल्पना आणि संस्थांचा विकास या विषयातील महत्त्वपूर्ण पैलूंवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
“प्रारमिक भारतातील संकल्पना आणि संस्थांचा विकास' या पुस्तकाच्या सुरूवातीला प्रारंमिक भारताची संकल्पना व वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यात आली आहे. प्रारंमिक भारताच्या इतिहास लेखनाबाबत आढावा घेण्यात आला आहे. प्रारंमिक भारताच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पुरातत्त्वीय, वाडूमयीन, पुराभिलेखीय व परकीय साधनांची माहिती देण्यात आली आहे. प्रारंभिक भारतातील राजकीय संस्था आणि संकल्पना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तात्कालिन सामाजिक संस्था आणि संकल्पना यांचा देखील अभ्यास प्रस्तुत पुस्तकाद्वारे करण्यात आला आहे. प्रारंमिक भारतात आर्थिक जीवनाची देखील जडण-घडण झालेली दिसते. त्यामुळे तात्कालीन शेती, व्यापार आणि नागरीकरण याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एकूण प्रारंमिक भारतातील संकल्पना आणि संस्था यांचा विकासक्रम स्पष्ट करणारे हे एक उपयुक्त पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. History Students.
Table of Content:
1. Defining Early India
2. Sources : Perceptions, Limitations, Range
3. Political Ideas and Institutions: North and South India
4. Social ideas and institutions
5. Economy