इतिहास मराठा राजतंत्र by Dr. Sunil Khilari, Dr. Rajendra N. Raskar
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. इतिहास (मराठा राजतंत्र - HS-C3) या पेपरच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या सुधारणांची जून २00१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात मराठा राजतंत्रातील महत्त्वपूर्ण पैलूवर सविस्तरपणे प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
“मराठा राजतंत्र' या पुस्तकाच्या सुरूवातीला मराठी राजतंत्राची संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे. मराठाकालीन इतिहासाविषयी माहिती पुरविणाऱ्या इतिहास लेखन साधनांचा आढावा घेण्यात आला आहे. मराठा राज्यव्यवस्थेची उभारणी व स्वरूप याबाबत उपयुक्त माहिती हे पुस्तक पुरविते. मराठाकालीन प्रशासन व्यवस्था, न्यायव्यवस्था व लष्कर व्यवस्था यांची तपशीलवार माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. मराठाकालीन प्रमुख राजकीय व सामाजिक सत्ताकेंद्रांचा आढावा पुस्तकाद्वारे घेण्यात आला आहे. एकूणच मराठा राजतंत्रातील राजकीय, प्रशासकीय व्यवस्थेची सर्वांगीण माहिती पुरविणारे हे एक वेगळ्या शैलीचे पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. History Students.
Table of Content:
1. Defining the term ‘Maratha Polity’
2. Nature of Sources: Perceptions, Limitations, Range
3. Maratha State
4. Administrative Structure
5. Socio-Political Power Structure
6. Administration of Justice