भारतीय आर्थिक पर्यावरण by प्राचार्य डॉ. डी. जी. उशीर, डॉ. एस. आर. जावळे, डॉ. विजयकुमार जी. वावळे
Book Summary:
आम्ही प्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर 1 साठी लिहिलेल्या 'भारतीय आर्थिक पर्यावरण भाग 1' या पुस्तकाला विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आम्हाला सत्र-2 चे 'भारतीय आर्थिक पर्यावरण भाग 2 हे पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरणा मिळाली.
अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करताना अभ्यास मंडळाने खरोखरच खूप सूद्म विचार करून चालू परिस्थितीशी निगडित असे बदल सुचविले आहेत. त्याचा विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये निश्चितपणे हातभार लागणार आहे. पुस्तक पूर्ण करताना लेखकांचाही कस लागला आहे. त्याबद्दल आम्हाला आनंदच वाटतो आहे.
सदर पुस्तक पूर्ण करताना अनेक संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, वेबसाइटस यांचा आधार घेतला व पुस्तक अधिकाधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाची भाषा साधी व समजण्यास सोपी आहे. ज्या-ज्या ठिकाणी योग्य मराठी शब्द मिळाले नाहीत तेथे इंग्रजी शब्दांचाच उपयोग करण्यात आला आहे. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला या वर्गासाठी लिहिलेले असले तरी इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्याना तसेच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यानाही उपयुक्त आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A Students.