मी अहमदनगर येथे अध्यापनाचे कार्य केले. या काळात “शैक्षणिक प्रयोगात" असा एखादा तयार शब्दकोश असावा असे माझ्या मनात वारंवार मनात येत असे.
त्या विचारधारेतून वर्णक्रमांकी, वर्णक्रमी - बहूडरेशीय (मराठी-मराठी) शब्दकोश म्हणून *भालचंद्र -शब्दकोश"* निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला.
वर्णक्रम, क्रमांक, अक्षरसंख्या असे विविध गट केले.
शब्दकोश याचा अर्थ केवळ समानार्थी शब्द, अर्थछटा इतकाच मर्यादित न राहता शब्दकोशाचा उपयोग अनेक प्रकारे करता यावा ही मूळ धारणा ठेवली. सुमारे चार वर्षांच्या प्रयत्नानंतर ग्रंथ लिखित स्वरूपात साकारला.
अशा प्रकारचा 'शब्ढकोश' इतर भाषात नाही. हा पहिलाच प्रयत्न असल्याने वाचकांनी, अभ्यासकांनी साकल्याने पाहून त्याचे स्वागत करावे ही मनेच्छा. विविध ठिकाणचे भाषातज्ज्ञ, भाषा अध्यापक, अनेक प्रकाशक, अभ्यासक यांना प्रस्ताव दाखवून त्याची प्रात्यक्षिके सादर केली.
ग्रंथ तयार होत असताना संदर्भासाठी अनेक शब्दकोश वापरले. विस्तारित *“*शब्दरत्नाकार'" (वा.गो.आपटे/ह.अ.भावे) हा ग्रंथ आधार म्हणून वापरला. शब्ढसंख्या मर्याढा/निश्चिती, अर्थ७टा निश्चिती, संक्षेप पाहणे यासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरला.