अर्थशास्त्र (वृद्धि आणि विकास - I) by Prof. Dr. Gautam Laxman Bhong, प्रा. डॉ. सुहास आव्हाड
Book Summary:
पुणे विद्यापीठाने जून २0१४ पासून (एमप.ए-भाग दोन) या शैक्षणिक वर्षाच्या सत्र तीन साठीच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक व श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एम. एम. अर्थशास्त्र (EC-3002) वृद्धी आणि विकास - 9' या पेपरच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. या सुधारीत अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात वृद्धी आणि विकासाच्या संदर्भातील महत्त्वपूर्प घटकांचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
'वृद्धी आणि विकास -9' या पुस्तकाच्या सुरूवातीला आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि अल्पविकास या संकल्पनांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आर्थिक विकासाचे मोजमाप, अल्पविकसीत राष्ट्रांची वेशिष्ट्ये, उत्पन्न वितरण आणि विकासातील अंतर, दरडोई उत्पन्न, मानवी विकास निर्देशांक या घटकांच्या आधारे आर्थिक विकास प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला आहे. आर्थिक वृद्धी आणि विकास यांचे स्पष्टीकरण देणारे वेगवेगळे सिद्धांत प्रचलित आहेत. या सर्व सिद्धांताचा परामर्श हे पुस्तक घेते. आर्थिक विकास प्रक्रियेत अडथळा ठरणाऱ्या दारिक्र्य आणि उत्पन्न विषमता या घटकांचे विश्लेषण याद्वारे करण्यात आले आहे. लोकसंख्या वृद्धी आणि आर्थिक विकास यातील परस्पर संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एकूणच वृद्धी आणि विकास यांचे सेद्धांतीक अवलोकन करणारे हे एक वेगळ्या शैलीचे पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Economic Students.
Table of Content:
1. Development and Underdevelopment: An Overview
2. Poverty and inequality
3. Theories of Economic Growth and Development
4. Population growth and economic development