अर्थशास्त्र, सार्वजनिक अर्थशास्त्र (भाग - 1) by Prin. Dr. Kundlik Shinde, Dr. Suhas Avhad
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. अर्थशास्त्र (सार्वजनिक अर्थशास्त्र -।) (EC-1002) या पेपरच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या सुधारणांची जून २0१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात सार्वजनिक अर्थशास्त्राबाबत महत्त्वपूर्ण विवचेन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
प्रस्तुत पुस्तकात सार्वजनिक अर्थशास्त्राच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आधुनिक काळात सरकारच्या भूमिकेत महत्त्वपूर्ण बदल घडून येत आहे. त्यामुळे सरकारच्या बदलत्या भूमिकेचे विश्लेषण या पुस्तकाद्वारे करण्यात आले आहे. सार्वजनिक धोरण हे विविध तत्त्वांच्या अनुशंगाने कार्यरत असते. सार्वजनिक धोरणाच्या या आधारतत्त्वांची सविस्तर मांडणी पुस्तकाद्वारे करण्यात आली आहे. सार्वजनिक कराद्वारे सरकारला महसूल प्राप्त होत असतो. त्यामुळे सार्वजनिक करांची तत्त्वे, संरचना सिद्धांत आणि वृद्धी याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सरकारद्वारे जे खर्च केले जातात त्यासंदर्भात विविध सिद्धांत प्रचलित आहे. त्यामुळे सार्वजनिक खर्चाच्या या विविध सिद्धांतांचा आढावा घेण्यात आला आहे. सार्वजनिक खर्चाची संरचना व त्यातील वाढ जाणून घेण्यात आली आहे. एकूणच सार्वजनिक अर्थशास्त्रातील महत्त्वपूर्ण घटकांची माहिती पुरविणारे हे एक उपयुक्त पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Economic Students.
Table of Content:
1. Introduction
2. Rationale for Public Policy
3. Taxation
4. Public Expenditure