अर्थशास्त्र (लोकसंख्याशास्त्र) by प्रा. डॉ. सुहास आव्हाड, प्रा. डॉ. नीलेश दांगट, Prof. Dr. T. G. Gite, Prof. Dr. S. S. Patil
Book Summary:
पुणे विद्यापीठाने जून २09४ पासून (एम. ए-भाग दोन) या शेक्षणिक वर्षाच्या सत्र तीन साठीच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक व श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एम. एम. अर्थशास्त्र (EC-3004) 'लोकसंख्याशास्त्र' हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे. या सुधारीत अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात लोकसंख्याशास्त्र संदर्भातील महत्त्वपूर्प घटकांचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
लोकसंख्याशास्त्र या पुस्तकाच्या युरूवातीला लोकसंख्याशास्त्राचा अर्थ स्वरूप, व्याप्ती व महत्त्व या संदर्भात विवेचन करण्यात आले आहे. लोकसंख्या अध्ययनाचा विकासक्रम स्पष्ट करण्यात आला आहे. लोकसंख्या अध्ययनासंदर्भात प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या सेच्चांतीक प्रवाहांचा या पुस्तकाच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला आहे. जननक्षमता, मर्त्यता, स्थलांतर, जनगणना हे लोकसंख्याशास्त्राचे महत्त्वाचे अभ्यास घटक आहे. या सर्व घटकांवर विस्ताराने प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक लोकसंख्येची वाढ आणि वितरण या संदर्भात महत्त्वपूर्प विवेचन हे पुस्तक करते. भारतातील श्रमशक्ती संदर्भात देखील माहिती पुरविण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचा आढावा याद्वारे घेण्यात आला आहे. एकूणच लोकसंख्याशास्त्रातील महत्त्वपूर्प घटकांचे विश्लेषण करणारे हे एक वेगळ्या शेलीचे पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Economic Students.
Table of Content:
1. Demography
2. Population theories
3. Population structure and characteristics
4. Population distribution