अर्थशास्त्र, ग्रामीण अर्थशास्त्र by Dr. Sunil Pawar, Dr. Vijay Desai
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. अर्थशास्त्र (ग्रामीण अर्थशास्त्र) (EC-1004) या पेपरच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या सुधारणांची जून २00१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात ग्रामीण अर्थशास्त्राबाबत महत्त्वपूर्ण घटकांचे विवचेन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
प्रस्तुत पुस्तकाच्या सुरूवातीला ग्रामीण विकास या संकल्पनेचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेती या संदर्भात महत्त्वपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विस्ताराने आढावा घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील औद्योगिकीकरण आणि उद्योजकता याबाबत माहिती देण्यात आली आहे. ग्रामीण वित्तपुरवठा, त्याचे स्त्रोत आणि ग्रामीण वित्तपुरवठ्यासमोरील आव्हाने याबाबत परामर्श घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील रोजगार आणि बेकारी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ग्रामीण श्रम विभागणीबाबत देखील चर्चा करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्य आणि असमानता याबाबत माहिती देण्यात आली असून ग्रामीण भागातील सर्वसमावेशक विकासाची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली आहे. एकूणच ग्रामीण विकासाबाबत स्पष्टीकरण देणारे हे एक उपयुक्त पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Economic Students.
Table of Content:
1. Rural Development
2. Rural Infrastructure
3. Rural Credit
4. Rural Employment