अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापार by Prin. Dr. M. U. Mulani, Dr. Suresh Patil
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. अर्थशास्त्र (आंतरराष्ट्रीय व्यापार) (EC-1003) या पेपरच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या सुधारणांची जून २0१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत महत्त्वपूर्ण घटकांचे विवचेन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
“आंतरराष्ट्रीय व्यापार' या पुस्तकात सुरूवातीला अभिजात व आधुनिक व्यापार सिद्धांताचे अवलोकन करण्यात आले आहे. व्यापारशर्ती, व्यापारशर्तीचे प्रकार व व्यापारशर्तीवर परिणाम करणारे घटक याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मुक्त आणि नियंत्रित व्यापाराचे धोरण, जकाती आणि जकातीचे परिणाम, जकातेतर अडथळे आणि स्टॉपलर-सॅम्युअलसन प्रमेय याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गॅट, डंकेल प्रस्ताव, जागतिक व्यापार संघटना, जागतिक व्यापार वृद्धी याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय व्यापार या घटकाचे विश्लेषण करणारे हे एक वेगळ्या शैलीचे पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Economic Students.
Table of Content:
1. Overview of Classical and Modern Trade Theories
2. Terms of Trade
3. Trade Policy
4. Trade Agreements and Organization