अर्थशास्त्र आधुनिक बँक व्यवसाय by प्रा. डॉ. नीलेश दांगट, Prof. Dr. Suresh Shrawan Patil, Prof. Dr. M. U. Mulani
Book Summary:
पुणे विद्यापीठाने जून २0१४ पासून (एम. ए-भाग दोन) या शैक्षणिक वर्षाच्या सत्र तीन साठीच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक व श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एस. एम. अर्थशास्त्र (EC-3003) (आधुनिक बँक व्यवयाय' या पेपरच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. या सुधारीत अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात आधुनिक बँक व्यवसाय संदर्भातील महत्त्वपूर्ग घटकांचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
आधुनिक बँक व्यवसाय या पुस्तकाच्या सुरूवातीला वित्तीय व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. वित्तीय व्यवस्थेचे स्वरूप, रचना, थूसिका आणि कार्ये या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. वित्तीय विकासाचे सिद्धांत, बॅकेचे गुंतवणूक धोरण, व्यापारी बँकेचा ताळेबंद याबाबत विवेचन करण्यात आले आहे. भारतातील आधुनिक बँक व्यवसायावर देखील विस्ताराने प्रकाश टाकण्यात आला आहे. धरारतातील बँक व्यवसाय क्षेत्रातील सद्यकालीन प्रवाह आणि आव्हाने या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती हे पुस्तक पुरविते. भारतातील बॅकेतर वित्तीय संस्थांचा विस्ताराने आढावा या पुस्तकाद्वारे घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारपेठांचे विश्लेषण देखील या पुस्तकाद्वारे करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वित्तीय संस्था आणि वित्तीय अरिष्ट याबाबत उपयुक्त माहिती हे पुस्तक पुरविते. एकूणच आधुनिक बँक व्यवसायाची सेक्धांतिक मांडणी करणारे हे एक उपयुक्त पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Economic Students.
Table of Content:
1. Introduction
2. Modern Banking in India
3. Non-banking Financial Institutions in India
4. International Financial Markets