आरोग्य आणि शारीरिक शिक्षण (In Marathi) by Dr. Sopan A. Kangdhe, Sanjvee Ba. Pawar
Book Summary:
आरोग्य आणि शारीरिक शिक्षण प्रक्रिया यशस्वी राबविली गेल्यास विद्यार्थ्यांत असलेल्या जीवन ऊर्जेच्या स्रोतात नवनिर्मितीस वाव नसला तरी त्यात निश्चित सुधारणा होऊ शकते. परंतु सध्याच्या यांत्रिक युगाने आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक आरामदायी जीवनशैली बहाल केली आहे. विविध संशोधन अभ्यासाचे निष्कर्ष प्रकर्षाने असे सुचवितात की, या आधुनिक आरामदायी जीवनशैलीमुळे मनोकायिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. उदाहरणार्थ, अकाली मृत्यू, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इत्यादी. तसेच ताण हा एक घटकसुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करीत आहे, त्यामुळे या अतिशय गंभीर स्वरूपाच्या समस्यांची जाणीव विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातच करून देणे अधिक फायदेशीर ठरेल. या बदलत्या आधुनिक जीवनशैलीला, बदलाच्या वेगाला/गतीला अतिशय धैर्याने, खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षणाच्या बदललेल्या अभ्यासक्रमात संपूर्ण नवीन दृष्टिकोन स्वीकारला आहे. नव्या युगाची आव्हाने समर्थपणे स्वीकारण्यासाठी, नवीन/सुधारित मनोभूमिका स्वीकारून हा अभ्यासक्रम राबविण्याची गरज आहे, ज्यातून अपेक्षित फलनिष्पत्ती होईल.
Audience of the Book :
This book Useful for Clas-XI & XII students.